आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:मालगाडीतून कोळसा चोरी; तिघांवर गुन्हा

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपनगर प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी कोळसा पुरवणाऱ्या धावत्या वॅगनमधून कोळसा चोरी केल्याप्रकरणी फुलगाव येथील करण कैलास कुऱ्हाडे याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला. कनिष्ठ सुरक्षा अधिकारी कुणाल वाघोदे यांनी फिर्याद दिली.

त्यात करण कुऱ्हाडे व अन्य दोन संशयित १४ रोजी रात्री ८.१५ वाजता पिंप्रीसेकम गेटजवळील धावत्या वॅगनमधून २० हजार रुपये किमतीचा ५ टन कोळसा चोरी करताना आढळले. या प्रकरणी तालुका पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास सहायक फाैजदार श्यामकुमार मोरे करत आहेत. दरम्यान, मालगाडीतून या मार्गावर काेळसा चाेरणारे रॅकेट तर नाही ना? याचा शाेध संबधित प्रशासनाकडून घेतला जाताे आहे.

बातम्या आणखी आहेत...