आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबरी चोरी:घरफोडीच्या घटनांनी भादली हादरले! एकाच रात्रीत फोडली सात घरे, लाखोंचा ऐवज लंपास

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून अवघ्या 10 किलाेमिटर अंतरावर असलेल्या भादली गावात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी सात घरांचे कुलूप कटरने कापून चोरी केली. यात रोकड, दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. बुधवारी सकाळी या घटना उघडकीस आल्या.

भादलीतील रडेवाडा येथील रामचंद्र बाबुराव रडे, चिंधु वामन रडे, योगेश हेमचंद्र झांबरे, काशिनाथ सखाराम रडे यांच्याकडे तर मस्जीद चौकातील राजेंद्र रमेश चौधरी, दीपक जनार्दन चौधरी व तुळशीदास श्रावण चौधरी यांच्या घरी या चोऱ्या झाल्या. सर्वांच्या घराची कुलूप, कडी-काेयंडे कटरने कापलेली आहेत. पहाटे चार वाजता गावातून सहा जणांना संशयितरित्या पळुन जाताना एका महिलेने पाहिले आहे.

बुधवारी सकाळी या घटना उघडकीस असल्यानंतर पोलिस पाटील अ‌ॅड. राधीका ढाके, नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. रामचंद्र रडे यांच्या घरातून 13 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 1 लाख 68 हजार रुपयांची रोकड चोरीस गेली आहे. इतर लोकांच्या घरातून चोरीस गेलेल्या ऐवजाची मोजणी दुपारपर्यंत सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...