आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची शक्यता:पुढील दाेन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचे संकेत

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसभराच्या उकाड्यानंतर रविवारी रात्री पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी ८.५ मिलिमीटर पावसाची नाेंद करण्यात आली. पुढील दाेन दिवस जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. रविवारी सायंकाळनंतर मात्र जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात सर्वाधिक ५४ मिलिमीटर पाऊस बाेदवड तालुक्यातील नाडगाव मंडळात झाला.

भुसावळमध्ये वरणगावला १९ मिलिमीटर, पिंपळगाव येथ ३६ मिलिमीटर पावसाची नाेंद करण्यात आली. रावेर तालुक्यातील खिराेदा, खिर्डी, निंभाेरा आणि एेनपूर येथे जाेरदार पाऊस झाला. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे २७ मिलीमीटर, कुऱ्ह्यात २२ मिलीमीटर पावसाची नाेंद करण्यात आली. जामनेर, नेरी, वाकडी, फत्तेपूर या मंडळामध्ये प्रत्येकी २५ ते २८ मिलिमीटर पाऊस झाला. पाचाेऱ्यातील नांद्रा आणि वरखेडी येथे दमदार पाऊस झाला. भडगाव तालुक्यात १४ मिलिमीटर पावसाची नाेंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...