आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमोल्लंघन:टनोगणती खरे सोने ‘लुटणारी’ माणसे आहेत सुवर्णनगरीत

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसरा म्हणजे सीमोल्लंघन आणि सोने लुटण्याचा दिवस. प्रत्यक्ष सोने लुटणे म्हणजे वाटणे शक्य नसल्याने आपण आपट्याच्या झाडाची पानेच सोने म्हणून लुटतो. पण खरे सोने दुसऱ्याच्या हातात देणारेही अनेक हात या सुवर्णनगरीत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत टनोगणती सोने त्यांनी आपल्या हाताने लोकांच्या हातात दिले आहे.

अर्थात, हे हात आहेत सोने-चांदीच्या शोरूममध्ये वर्षानुवर्षे सेल्समन किंवा सेल्सवूमन म्हणून काम करणाऱ्यांचे. कोणी ३० वर्षांपेक्षा अधिक काळ तर कोणी ४० वर्षांपेक्षा अधिक काळ शोरूममधले सोन्याचे दागिने ग्राहकांच्या हातात दिले आहे. एक ग्राहक काही ग्रॅम किंवा काही तोळे सोने खरेदी करत असला तरी प्रत्यक्षात त्या वजनाच्या कितीतरी पट अधिक वजनाचे सोने खरेदीच्या आधी हाताळतो. एका दिवसात एक सेल्सपर्सन किती तरी ग्राहकांना हाताळतो. अशी गणती केली तर आपल्या सेवाकाळात लाखो किलो सोने ग्राहकांच्या हाती देणारेही सेल्सपर्सन या शहरात आहेत.

सोन्याचे मूल्य कळाल्याची भावना
शहरातील ज्या सेल्सपर्सनशी बोलणे झाले त्यांना या कामातून सोन्याचे खरे ‘मूल्य’ कळाल्याची आणि त्यामुळे थोडे थोडे सोने दर महिन्याला खरेदी करण्याची सवय लावून घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. इतक्या वर्षांत सोन्याच्या वाढत जाणाऱ्या किमती त्यांनी पाहिल्या आहेत हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे.

बातम्या आणखी आहेत...