आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटपाल तिकिटांवर प्रत्येकाला आपला फोटो लावायची अभिनव संधी पोस्ट विभागाने उपलब्ध करून दिली आहे. तिकिटांचा छंद जोपासण्याबरोबरच आता स्वत:चा फोटो असलेले अथवा एखाद्यास भेटवस्तू म्हणून त्याचा फोटो लावलेले टपाल तिकीट देण्याचा ट्रेंड सध्या वाढत आहे. निमंत्रण पत्रिकेला वधू-वरांचे फोटो असलेले टपाल तिकीट लावून ती पाठवण्याची क्रेझदेखील वाढली आहे. दरम्यान, पोस्ट कार्यालयातील कर्मचारी शाळेत जाऊन टपाल तिकिटाची माहिती देत आहेत.
कसे बनवता येईल माय स्टॅम्प फोटो
योजनेंतर्गत पोस्ट कार्यालयात आपला फोटो व आधारकार्ड देऊन अवघ्या ३०० रुपयांत १२ तिकिटांची शीट विभागाकडून दिली जाते. ही तिकिटे इतर टपाल तिकिटांप्रमाणे देशातील कुठल्याही भागात पाठवणे शक्य आहे. यासह हे तिकीट संग्रहीही ठेवले जातात. पोस्ट विभागाच्या औरंगाबाद कार्यालयाकडून ही तिकिटे तयार होऊन येतात. कुटुंबीयांचा फोटो किंवा लग्नाच्या निमित्ताने वधू-वरांचे फोटो तिकिटावर छापले जात आहेत. यासह राखी पौर्णिमेला बहीण आणि भाऊ, फ्रेंडशिप डे ला मित्र-मैत्रिणी, लग्नाच्या वाढदिवसाला पती-पत्नी, या प्रकारे तिकीट बनवण्याकडे कल हळूहळू वाढू लागला आहे.
भेटवस्तू म्हणून दिले जातेय तिकीट
माय स्टॅम्पद्वारे टपाल तिकीट बनवलेल्या व्यक्तीस समाजात मान-सन्मान वाढतो. संग्रहकार ही तिकिटे छंद म्हणून वापरतात. या वापरातून विभागाचा महसूलही वाढतो आहे. ग्राहकांकडून या स्टॅम्पला मागणीही वाढत आहे. शाळांमध्येही याचा प्रचार केला जात आहे. भोजराज चव्हाण, डाक अधीक्षक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.