आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावधान!:कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही जागा शिल्लक नाही

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • २ दिवसांत ४१ जणांवर अंत्यसंस्कार, ओटे कमी पडल्याने जमिनीवरही रचली चिता

कोरोना बाधितांसाठी आरक्षित केलेल्या नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी ‘वेटिंग’ची वेळ अाली अाहे. दाेन दिवसांत ४१ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात अाले अाहेत. अाेटे व पिंजरे कमी पडत असल्याने अक्षरश: जमिनीवर चिता रचण्याची वेळ प्रशासनावर अाली अाहे. शहरासह जिल्ह्यातील काेराेना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली अाहे. दरराेज ९०० पेक्षा जास्त काेराेनाबाधित अाढळत अाहेत. संसर्गाचा वाढता अालेख धडकी भरवणारा ठरत असताना मृत्यूचा अाकडाही वाढत अाहे. यात वृद्धांसाेबतच चाळिशीतील रुग्णांनाही मृत्यूने कवटाळले अाहे.

दररोज अाठपेक्षा जास्त रुग्णांचे मृत्यू हाेत अाहेत. जळगाव शहरात उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने मृतांवर जळगाव शहरातच अंत्यसंस्कार केले जात अाहेत. यासाठी महापालिकेने काेराेना बाधितांवर अंत्यसंस्कारासाठी नेरीनाका स्मशानभूमी अारक्षित केली अाहे; परंतु गेल्या चार दिवसांत नेरीनाका येथील परिस्थिती गंभीर झाली असून, जागा कमी पडत असल्याने मृतांच्या नातेवाइकांना वेटिंग करावी लागत अाहे. त्यामुळे दु:खद प्रसंगात मृतांच्या नातेवाईकांसमोर वाईट प्रसंग उद्भवतो.

कर्मचाऱ्यांचा तुटवडा
नेरीनाका स्मशानभूमीत पालिकेकडून एकच कर्मचारी नियुक्त करण्यात अाला अाहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी पालिकेच्या अास्थापनेवरील एकच कर्मचारी असल्याने नियाेजन विस्कळीत हाेत अाहे. ठेकेदाराकडील तीन कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात असली तरी प्रशासनाने नागरिकांचे हाल टाळण्यासाठी आणखी कर्मचारी नियुक्तीची गरज व्यक्त हाेत अाहे.

जमिनीवरच रचली चिता
नेरीनाका स्मशानभूमीत १७ अाेटे अाहेत. त्यापैकी १२ पिंजरे तर ५ अाेटे अाहेत. सर्व १७ अाेट्यांवर अंत्यसंस्कार झाल्याने जागा कमी पडत अाहे. त्यामुळे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी थेट नातेवाइकांच्या मागणीनुसार जमिनीवरच चिता रचण्यास सुरुवात केली अाहे. त्यामुळे स्मशानभूमीतील खुली जागादेखील कमी पडायला लागली अाहे.

नातेवाईक ताटकळले
गेल्या दाेन दिवसांत नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह वाढले अाहेत. रविवारी तर दिवसभरात २५ जणांवर अंत्यसंस्कार झााले. त्यानंतर साेमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत १६ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात अाले अाहेत. जागा कमी असल्याने मृतांच्या नातेवाइकांना वेळ देण्यात येत असून वेटिंग करावी लागत अाहे.
नेरीनाका स्मशानभूमीत आता कोरोनाबाधित मृतांवर जमिनीवरही अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. छाया: अाबा मकासरे

बातम्या आणखी आहेत...