आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेवढे डॉक्टर, इंजिनिअर आहेत तेवढ्याच प्रमाणात कलाकार तयार झाले पाहिजेत. खान्देश हा विविध जातीय व्यवस्थेने नटलेला प्रदेश आहे. त्यामुळे २० हजार वर्षांपूर्वीची मातृसत्ताक पद्धती पुन्हा रूढ झाली पाहिजे, असे प्रतिपादन साहित्यिक ज्ञानपीठ विजेते डाॅ. भालचंद्र नेमाडे यांनी केले.भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार वितरण साेहळा मंगळवारी जैन व्हॅलीतील गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात झाला. या वेळी साहित्यिक नेमाडे म्हणाले की, खान्देशात एकाच जातीचा प्रभाव नाही. येथे अनेक जाती-पातीचे लोक आहेत.
ह्या पुरस्कारात सर्वप्रकारचे लोक असल्याचे दिसून येतात. हा पुरस्कार मिळवणारे साहित्यिक-कलाकार मोठे लोक आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर ते अधिक पुढे जातील यात शंका नसल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी ना. धों. माहनोर, फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन, दलिचंद जैन, ज्योती जैन, निशा जैन, भावना जैन, विशेष पाेलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर उपस्थित होते.कलेत परमेश्वर पहा : चित्रांना अर्थ, रूप नसते. जो ज्या पद्धतीने पाहील तो अर्थ त्याला मिळतो. चित्रातच परमेश्वर पाहिला पाहिजे, अशी भावना चित्रकार प्रभाकर कोलते यांनी व्यक्त केली.
साेहळ्यात या चार जणांना देण्यात आला पुरस्कार
कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार जगप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांना, कवयित्री बहिणाई पुरस्कार संध्या नरे-पवार (कुलपवाडी), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोंबरे पुरस्कार वर्जेश सोलंकी (आगाशी-वसई, मुंबई), श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कार प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना प्रदान करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.