आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:हेरवाडचा आदर्श जळगाव जिल्ह्यात घेण्याबाबत झाली सकारात्मक चर्चा ; अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे आजही पालन केले जाते. ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार हेरवाड ग्रामपंचायतीने केला. महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असे आवाहन करणारे परिपत्रक राज्य सरकारकडून जारी करण्यात आले. आता याच पॅटर्नची जळगाव जिल्ह्यात अंमलबजावणी करावी, यासंदर्भात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, स्वप्न साकार फाउंडेशन, हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला संस्थेच्या निवेदिता ताठे, कृती फाउंडेशनच्या डॉ. श्रद्धा माळी, माऊली फाउंडेशनचे सुनील पाटील, कमल केशव प्रतिष्ठानच्या भारती म्हस्के, अभिजित रंधे, सच्ची निशा पवार, सामाजिक कार्यकर्ता मंगला बारी या संस्थांनी मिळून चर्चा केली. पोलिस बिनतारी संदेश विभागाचे पोलिस उपनिरीक्षक संजय मराठे, अमित माळी, वसंत पाटील, राकेश कंडारे, उज्वला टोकेकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...