आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसाेय दूर‎:जळगाव-पाचाेरा मार्गावरील‎ 12  किमीचे भूसंपादन हाेणार‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या‎ जळगाव- पाचाेरा राष्ट्रीय‎ महामार्गाच्या अपूर्णावस्थेतील‎ कामाचा मार्ग माेकळा झाला आहे.‎ ५५ किलाेमीटर लांबीच्या मार्गात‎ सुमारे १२ किलाेमीटर लांबीच्या‎ महामार्गाचे काम रखडले हाेते; परंतु‎ आठ ठिकाणच्या भूसंपादनासाठी‎ अवॉर्ड जाहीर केला जाणार‎ असल्याने कामाला लवकरच‎ सुरूवात हाेईल. भूसंपादनाचा प्रश्न‎ मार्गी लागत असल्याने‎ वाहनधारकांची माेठी गैरसाेय दूर‎ हाेणार आहे.‎ जळगाव-पाचाेेरा-चाळीस गाव‎ मार्गे मनमाड जाण्यासाठी तयार‎ करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग‎ क्रमांक ७५३ वरील अनेक ठिकाणी‎ काम रखडले आहे.

जळगाव ते‎ पाचाेरा दरम्यान आठ ठिकाणी‎ काँक्रिटीकरण नसल्याने वाहनांचा‎ वेग मंदावताे. यात रामदेववाडी ते‎ वावडदा, वावडदा ते वडली, वडली‎ ते पाथरी, सामनेर ते लासगाव, नांद्रा‎ ते हडसन, हडसन ते खेडगाव‎ नंदीचे आदी ठिकाणी तुकड्यांमध्ये‎ काम अपूर्ण आहे. या ठिकाणी‎ शेतजमिनीच्या भूसंपादनाचा प्रश्न‎ निर्माण झाल्याने काम पूर्ण हाेऊ‎ शकले नव्हते. दरम्यान, धुळे‎ महामार्ग प्राधिकरणाकडून या‎ कामासाठी वरिष्ठ पातळीवर‎ वर्षभरापासून पाठपुरावा सुरू हाेता.

‎ त्यासाठी ११ किमी ८९० मीटर‎ लांबीच्या मार्गावरील‎ भूसंपादनासाठी अवॉर्ड घाेषीत केला‎ जाणार आहे. भूसंपादनाची रक्कम‎ जाहीर झाल्यानंतर न्यायालयीन वाद‎ देखील निकाली काढण्याचे प्रयत्न‎ हाेणार असल्याचे सूत्रांनी सांगीतले.‎ त्यामुळे वर्षभरानंतर जळगाव ते‎ पाचाेरा हा अखंडीत काॅक्रीटचा‎ रस्ता तयार हाेईल अशी शक्यता‎ निर्माण झाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...