आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • There Will Be Sewerage Along With Roads From 18 Cities In The City; ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​

सत्तांतर:शहरात 18 काेटींतून रस्त्यांसह गटारी हाेणार ; ​​​​​​​मनपावरील शिंदे सरकारची वक्रदृष्टी हटली

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महापालिकेच्या विकास कामांना लागलेली माेगरी अख‌ेर हटवण्यात आली आहे. शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर प्रथमच पाच महिन्यांनी १८ काेटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. राज्य शासनाच्या ७५ टक्के व मनपाच्या २५ टक्के निधीतून शहरात रस्ते, गटारी, खडीकरण तसेच सुशाेभिकरणाला जानेवारीत सुरुवात हाेणार आहे.

शासनाने मूलभूत साेयी सुविधांसाठी महापालिकेला १० काेटी, पाच काेटी व २ काेटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला हाेता. या निधीतून हाेणाऱ्या विकास कामांचे प्रस्ताव मनपाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर केले हाेते; परंतु या दरम्यान राज्यात सत्तांतर झाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात शिंदे गट तर महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता अशी विभागणी झाली. सत्ता स्थापनेनंतर प्रथम सर्वच कामांना स्थगिती देण्यात आली हाेती. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून महापालिकेंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामांचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत हाेता. अखेर विभागीय आयुक्तांनी या प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी दिली. त्यामुळे शहरातील १८ काेटींच्या कामांचा प्रश्न मार्गी लागला.

आठवडाभरानंतर निविदा महापालिका क्षेत्रात मंजूर शिवाजी उद्यान सुशाेभिकरण, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, काँक्रीटच्या गटारी, नाल्यांच्या संरक्षण भिंती, स्लॅब कल्व्हर्ट, खुल्या जागांना संरक्षण कुंपण आदी कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी मंजुरी मिळाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर आठवडाभराने निविदा प्रक्रिया सुरू हाेईल. त्यानंतर जानेवारीत या कामांना सुरुवात केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...