आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • This Month Will Be Beneficial For Purchase, Stability; ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​ Ethicists Say, Increase In Decision making Ability Is Possible| Marathi News

दिव्य मराठी विशेष:खरेदी, स्थैर्यासाठी हा महिना ठरेल लाभदायी; ​​​​​​​ ज्याेतिषशास्त्राचे अभ्यासक म्हणतात, निर्णय क्षमतेत वाढ शक्य

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सप्टेंबर महिन्यात त्रिवेणी कृपेचा योग आहे. गणेशोत्सवाचे दहापैकी नऊ दिवस या महिन्यात आहेत. पितृपक्षाचे १६ दिवस आणि नवरात्रीचे पाच दिवसही याच महिन्यात आहेत. या महिन्यात सर्वार्थ सिध्दी, अमृत सिध्द योग आहेत. ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणरायांचे विसर्जन होईल. त्याशिवाय १० सप्टेंबरला पौर्णिमा आहे. या दिवशी पितृपक्षाची सुरुवात होणार आहे. २६ सप्टेंबरपासून नवरात्रीचा गजर हाेईल. एकंदरीत हा महिना खरेदी आणि मंगल कार्यांसाठी समृध्दीकारक आहे.

ज्योतिषतज्ज्ञ आणि पंडितांच्या अभ्यासानुसार गुरुवारने सप्टेंबर महिन्याचा प्रारंभ झालेला आहे. म्हणजेच हा निर्णय क्षमता विकसित करणारा महिना ठरेल. सप्टेंबरमध्ये ग्रहांचे राशी परिवर्तन होईल. त्यात बुध, कन्या राशी वक्री होतील. शुक्र, सिंह राशींमध्ये अस्त होईल. सूर्य त्याच्या स्व-राशी सिंहमधून कन्या राशीत विराजमान होईल. महिन्याच्या शेवटी एकदा पुन्हा शुक्र कन्या राशीत येईल. गेल्या गुरुवारी ऋषी पंचमी झाली. ३ सप्टेंबरला राधाष्टमी झाली. ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी करण्यात येईल. हा महिना उत्सवदायी असा आहे. गणेशोत्सव, पितृपक्ष आणि नवरात्रीचा प्रारंभ या महिन्यात आहे. धार्मिकदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या या महिन्यात आलेल्या सणांमुळे मांगल्याचे वातावरण या महिन्यात राहणार आहे.

या महिन्यातील खास योग
१३ सप्टेंबरच्या सकाळी ९.१२ ते रात्री पर्यंत, १७ सप्टेंबरला सूर्योदयपासून दुपारी १.५५ पर्यत व्दिपुष्कर योग, दुपारी १.५५ ते २.३४ पर्यंत, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.१३ पासून पुष्य नक्षत्र आणि २० सप्टेंबरच्या रात्री ९.१७ वाजेपासून २१ सप्टेंबरच्या रात्री ११.५० वाजेपर्यंत अमृत सिध्दी योग राहिल.

अमृत सिद्धी याेग
अमृत सिद्धी याेग उत्तम मानला जाताे. त्यात जी कार्य हातात घेतली जातात ती पूर्ण हाेतात. म्हणून बहुतांश शुभ कार्यासाठी हा याेग कसा साधला जाईल? याकडे भर दिला जाताे. ज्याेतिषशास्त्र अभ्यासकही या याेगात शुभ कार्य करण्याचे सुचवितात.

सर्वार्थ सिद्धी योग
४ सप्टेंबर सकाळी ७.३७ वाजेपासून रात्रीपर्यंत, ११ सप्टेंबरच्या सकाळी ९.४२ वाजेपासून रात्रीपर्यंत, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.१२ वाजेपासून रात्रीपर्यंत, १७ सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून दुपारी १.५५ वाजेपर्यंत, २५ सप्टेंबरला सूर्योदयापासून रात्रीपर्यंत, ३० सप्टेंबरच्या सकाळी ६ वाजेपासून रात्रीपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग राहणार आहे.

नवरात्रीचा काळ भरभराटीचा
गणेशाेत्सव म्हणजे विघ्ननिवारक मंगलपर्व आहे. पितृपक्षात किंचित कठीण काळ आहे. मात्र, असले तरी त्या पाठाेपाठ येणाऱ्या नवरात्रीनंतर पुन्हा शुभ काळ आहे. त्यात खरेदी लाभदायक ठरेल.
भूषण जाेशी धुळेकर गुरूजी, जळगाव

बातम्या आणखी आहेत...