आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात यंदा 98 विद्यार्थ्यांना मिळेल सुवर्णपदक ; ​​​​​​​राज्यपाल, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची ऑनलाइन उपस्थिती

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारंभ मंगळवारी सकाळी ९.३० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करणार आला आहे. यात ९८ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देण्यात येणार आहे. यंदा राज्यपालांसह प्रमुख पाहुणे ऑनलाइन उपस्थित राहणार असून पालकमंत्र्यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी हे दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान ऑनलाइन पध्दतीने भूषविणार असून दीक्षांत भाषण करणार आहेत. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता (नॅक) बंगळुरूचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन हे प्रमुख पाहुणे म्हणून स्नातकांना ऑनलाइन संबो‍धित करतील. या दीक्षांत समारंभास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे ऑनलाइन उपस्थित राहतील. याशिवाय पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री अब्दूल सत्तार हे देखील उपस्थित राहणार आहे. स्नातकांना पदवी प्रमाणपत्र मिळणे सोयीचे व्हावे, या करीता पदवी प्रमाणपत्राचे व उत्तरीय वाटप अभ्यासक्रमनिहाय प्रशासकीय इमारतीत पंधरा काउंटरवर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होईल. कार्यक्रम बघता यावे यासाठी महाविद्यालयांनी व्यवस्था करावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...