आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीकडून 7 भरारी पथकांद्वारे ठिकठिकाणी प्रवाशांची तपासणी:2021 च्या तुलनेत यंदा विनातिकीट प्रवाशांकडून तिपटीने दंड वसूल

जळगावएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना व एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एसटी महामंडळाची बस पूर्ण क्षमतेने मार्गावर धावत आहे. यात प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एसटीकडून 7 भरारी पथकांद्वारे ठिकठिकाणी प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.

या तपासणीत 2021 च्या मानाने आतापर्यंत एसटीने प्रवाशांकडून तीनपट दंड वसूल केला आहे. यात 2021 मध्ये 93 प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून 11 हजार 875 रुपये दंड वसूल केला होता. तर 2022 मध्ये आतपार्यंत या 7 भरारी पथकांडून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 33 हजार 976 दंड प्रवाशांकडून वसूल करण्यात आला आहे.

एसटी महामंडळातर्फे रेल्वेप्रमाणे विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी एसटीने 7 भरारी पथके नेमली आहे. या भरारी पथकांडून जानेवारी 2022 ते आतापर्यंत 172 विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. या भरारी पथकात महामंडळातील विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या भरारी पथकाकडून जळगाव विभागातून बाहेरगावी जाणाऱ्या-येणाऱ्या बसेसची रस्त्यात कुठेही थांबवून प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात येते.

या भरारी पथकातील अधिकाऱ्याला तिकीट तपासणी मोहिमेत जो प्रवासी बसमधून विनातिकीट प्रवास करताना आढळून आल्यास त्या प्रवाशांला प्रवासी भाड्याच्या दुपटीने किंवा 100 रुपयांचा दंड या पैकी जो अधिक असेल तो आकारण्यात येतो. हे भरारी पथक स्थानकात बस आल्यावरही उतरणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करू शकणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी कारवाई टाळण्यासाठी उत्स्फूर्तपणे तिकीट काढून महामंडळाला सहकार्य करण्याची गरज आहे.

विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर वचक बसण्यासाठी भरारी पथकांकडून एसटी बसेसची नियमित तपासणी करण्यात येते. यात प्रवाशांला तर दंड केला जातोच त्याचबरोबर त्या गाडीतील वाहकानेही तिकीट फाडण्यास हलगर्जीपणा अढळून आल्यास वाहकावरही कारवाई करण्यात येते.

- भगवान जगनोर, विभाग नियंत्रक

बातम्या आणखी आहेत...