आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांत लंपी स्कीन आजाराचा प्रादूर्भाव:लंपीमुळे यंदा पोळ्याला बैलांची पूजा गोठ्यात करा; जिल्हाधिकारी राऊत यांचे पशुपालकांना आवाहन

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर व यावल तालुक्यात जनावरांत लंपी स्कीन आजाराचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. शुक्रवारी पशुपालकांच्या जिव्हाळ्याचा पोळा सण आहे; मात्र बैलांचे या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण व्हावे, त्या आजाराची लागण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी पोळा सण सार्वजनिक साजरा करू नये. बैलांची पूजा गोठ्यातच करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

लंपी स्कीन आजार संसर्गजन्य असला तरी रोगाचे निदान लवकर झाल्यास व योग्य उपचार सुरु केल्यास आठ ते दहा दिवसांत तो बरा होतो. तसेच जळगाव जिल्ह्यात उपचाराअंती रोग बरे होण्याचे प्रमाण ९९ टक्के आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता शासकीय यंत्रणेमार्फत उपचार करुन घ्यावे. त्यासोबतच गोठा स्वच्छता व गोचीड निर्मूलन पशुवैद्यकीय दवाखाने यांच्या सहकार्याने करुन घ्यावे, असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...