आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’ च्या वाचकांना सल्ला:यंदा बेल, शमी, पिंपळ लावून अधिक पुण्य कमवा

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्रतवैकल्यांचा महिना अशी आेळख असलेला श्रावण सुरू झाला आहे. बेलासह विविध वृक्ष, वेलींची पाने पुजाविधीसाठी वापरली जातात. निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ राहिले तरी आरोग्यावर चांगला परिणाम होतो. श्रावणातला प्रत्येक दिवस हा व्रत असल्यासारखा आहे. हे व्रत निसर्गाशी निगडित आहे. त्यामुळे केवळ बेल, शमी यांची पाने न तोडता या श्रावणात एक तरी बेल, शमी किंवा पिंपळाचे झाला लावा. त्यामुळे अधिक पुण्य मिळू शकेल, असा सल्ला श्रीराम मंदिर संस्थानचे गादिपती मंगेश महाराज यांनी भाविकांना दिला.

श्रावणात वेगवेगळी झाडे, वेली व गवताच्या पत्री (पाने) पुजेसाठी वापरली जातात. या झाडे-वेलींचे पूजेप्रमाणेच औषधीदृष्ट्याही तेवढेच महत्त्व आहे. त्यांचे जतन व्हायला हवे यासाठी धार्मिक महत्व कमी न होऊ देता काय करता येईल, असे ‘दिव्य मराठी’ने मंगेश महाराज यांना विचारले. त्यावर त्यांनी भाविकांना झाडे लावण्याचा सल्ला दिला. श्रावण असो की कोणताही महिना, झाडे लावल्याने आणि निसर्गाचे संगोपन केल्याने पुण्यच मिळेल, असे ते म्हणाले. पुजेसाठी ही झाडे मूळापासून न ओरबाडता आवश्यक असेल तेवढीच पाने खुडून घ्यावीत. निसर्गाकडून आपण जसे घेतो तसे आपणही या दिवसांत एकतरी बेल, शमी, पिंपळाचे राेपटे लावून ते जगवायला हवे, असा सल्ला त्यांनी श्रावणात बेल, पत्रीने पूजा करणाऱ्या भाविकांना दिला. जळगावकर नागरिक असे करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

श्रावणातील सण आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध वनस्पती नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, दहीहंडी, पोळा व श्रीकृष्ण जयंती, श्रावण सोमवार आदी सण-उत्सव श्रावण महिन्यात येतात. या महिन्यात कटुर्ले, कुंजीर, शिंदे, आघाडा, भारंगी, कुरडू, केना, चिराटी, घोळ, करांदे, हलुंदा, पेव, गजकर्णिका, जिवती, टाकळा, माकडशिंगी, हमाम, करपुडी, फांग, बेल, तुळस, आघाडा, अर्जुन सादडा, शमी, आवळा, धोत्रा, बेल, रूई, करंडा या खाद्य व पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पती येतात. तर चवर, पाण-तेरडा, वन-तेरडा, माळी-मुसळी, अग्निशिखा, सीतेची आसवे, पंद निचुर्डी, शिवसुमन, कचोरा, कावळी, भुई-अमर्या, भूतकेस आदी रानफुले या महिन्यात येतात.

आवश्यक तेवढीच पाने ताेडायला हवीत
बेलाला धार्मिक महत्त्व आहे. तसेच या झाडाची फळेही औषधी गुणधर्मामुळे उपयुक्त आहेत. त्यामुळे या झाडाच्या फांद्या न तोडता केवळ पानेच तोडली गेली पाहिजे. या महिन्यात बेलाच्या झाडाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले जाते. त्यामुळे या झाडांची मोठ्या प्रमाणात हानी होते. पुजेसाठी पाहिजे तेवढीच पाने तोडावी, असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेचे संस्थापक बाळकृष्ण देवरे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...