आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा डिसेंबर महिन्यापर्यंत 64 विवाहांचे मुहूर्त आहेत. यात जून, जुलै अखेर दोन महिन्यात 14 मुहूर्त आहेत. या दोन महिन्यात 8 जुलै नवमीचा शेवटचा मुहूर्त आहे. त्यानंतर चातुर्मासाला सुरुवात होत असल्याने 140 दिवसांसाठी विवाहांना 'ब्रेक' लागणार आहे. त्यामुळे 26 नोव्हेंबरपासूनच शहनाई वाजेल. मात्र, यात काही गौण, चातुर्मास व अपत्कालीन काळीतीलही विवाह मुहूर्त असल्याचे भूषण जोशी धुळेकर गुरुजींनी सांगितले.
28 सप्टेंबर रोजी शुक्र तारा पूर्व दिशाला अस्त आणि 26 नोव्हेंबरला पश्चिम दिशेला उदय झाल्यावर पुन्हा विवाहांना सुरुवात होईल. मात्र, अपवादात्मक स्थितीत गौण, चातुर्मास व अपत्कालीन काळात विवाह मुहूर्तही आहेत. असे मुहूर्त जुलै ते डिसेंबर दरम्यान प्रत्येक महिन्यात आले आहेत. मात्र, चातुर्मासानंतर 26 नोव्हेंबरला पश्चिम दिशेला शुक्राचा उदय झाल्यानंतरच विवाह होऊ शकतील. जून ते डिसेंबरदरम्यान 6 दिवस विवाहांच्या सर्वाधिक शुभ तिथी आहेत.
अशा आहेत विवाहाच्या विशेष तिथी
8 जून- महेश नवमी, 9 जून- गंगा दशहरा, 10 जून निर्जला एकादशी, 14 जून वटपौर्णिमा, 3 जुलै चतुर्थी, 8 जुलै नवमी
यात अचला एकादशी, भडली नवमी, गंगा दशहरा हे मुहूर्त सर्वांधिक शुभ आहेत. या मुहूर्तात सर्वाधिक 12 मुहूर्त नोव्हेंबर महिन्यात आहेत.
असे आहेत मुहूर्त
जून- 1, 6, 8, 9, 10, 13, 14, 16, 18.
जुलै- 3, 5, 6, 7, 8.
गौण, चातुर्मास काळातील विवाह मुहूर्त-
जुलै- 1, 4, 14, 15, 18, 31.
ऑगस्ट- 3, 4, 7, 9, 10, 14, 15, 16, 29.
सप्टेंबर- 6, 7, 8, 27, 30.
ऑक्टोबर- 5, 6, 9, 10, 11, 29, 30.
नोव्हेंबर- 3, 5, 6, 10, 13, 14, 17, 28. तर तुळशी विवाहानंतर 25, 26, 28, 29.
डिसेंबर- 2, 4, 27. तुळशी विवाहानंतर 2, 4, 8, 9, 14, 16, 17, 18.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.