आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • This Year's Gaurai Utsav Is The Highlight Of The Scene; Three Days Stay Of Mahervashini Gourai From House To House By Saenpaval| Marathi News

उद्या होणार विसर्जन:यंदाच्या गौराई उत्सवामध्ये देखाव्याचे आकर्षण; साेनपावलांनी आगमन घरोघरी माहेरवाशिणी गौराईचा तीन दिवस मुक्काम

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आली आली गौराई, सोन्या रुप्याच्या पावलानं आली आली गौराई, धन धान्याच्या पावलानं’ या स्वागत गीतासह पारंपरिक पद्धतीने शनिवारी तीन दिवसांची माहेरवाशिणी म्हणून गौराईचे स्वागत अत्यंत थाटामाटात झाले. यंदा गाैराईच्या स्वागतासाठी खास केदारनाथ, अष्टविनायक, निसर्गरम्य देखावे तयार करण्यात आले असून ते आकर्षण ठरत आहे.

शनिवारी गौराईचे आगमन झाले. घरामध्ये गौर आणतेवेळी ‘गौरी कशाच्या पाउली आली गं, सोन्या-मोत्याच्या पाउली आली गं’ असे म्हणत गौरीचे आगमन मुहूर्ताप्रमाणे केले गेले. यानिमित्त अनेक घरांमध्ये सुवासिनींनी सुंदर वस्त्रालंकार परिधान करून मोठ्या थाटामाटाने गौराईचे स्वागत केले. घरातल्या सुवासिनींनी वाजत गाजत दारात आलेल्या गौराईची दृष्ट काढून तिला घरात आणली. त्यानंतर गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली. काही ठिकाणी या गौरी पाटावर विराजमान होत्या तर काही ठिकाणी उभ्या गौरी, काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या, खड्याच्या गौरी असल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...