आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांपूर्वी पदवीधर झालेल्यांना मतदार नोंदणी करता येणार:पदवीधर मतदार नोंदणीस सुरुवात, जिल्हाधिकारी राऊत यांची माहिती

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभागातील पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीसाठी नव्याने पदवीधर मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. अर्हता दिनांकाच्या 3 वर्षांपूर्वी पदवीधर झालेल्यांना मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

अर्हता दिनांकापूर्वी किमान तीन वर्ष भारतातील विद्यापीठाचा पदवीधर किंवा त्याच्याशी समकक्ष शैक्षणिक पात्रता असलेल्या व्यक्तींनी या कार्यक्रमाची नोंद घेऊन मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक 18 भरावा लागणार आहे. तो नमुना मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी मतदान नोंदणी अधिनियमांतर्गत 1 ऑक्टोबर रोजी जाहीर सूचना प्रसिध्द करण्यात येणार आहे.

30 डिसेंबरला अंतिम प्रसिध्दी

15 ऑक्टोबर रोजी नोटीसची प्रथम पुर्नप्रसिध्दी करण्यात येईल. 25 ऑक्टोबर रोजी व्दितीय पुर्नप्रसिध्दी करण्यात येईल. नमुना 18 व्दारे दावे व हरकती 7 नोव्हेंबरपर्यंत स्विकारण्यात येतील. हस्तलिखित तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई 19 नोव्हेेंबर रोजी करण्यात येईल.

प्रारुप मतदार याद्या २३ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येतील. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत दावे व हकरती स्विकारण्यात येतील. 25 डिसेंबर रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. 30 डिसेंबर रोजी मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी होईल.

बातम्या आणखी आहेत...