आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावल तालुक्यातील दोनगाव येथे आज अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर तलाठ्याने अडवला. मात्र, ट्रॅक्टरसोबत असलेल्या दुचाकीस्वारांनी तलाठ्याला ढकलून देत ट्रॅक्टर पळवून नेले. त्यामुळे दुचाकीस्वारांविरुध्द चोरी व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोलू बाविस्कर आणि सचिन बाविस्कर, अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही चोपडा येथील पुनगावचे रहिवासी आहेत.
आरोपींनी धमकावले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोनगाव गावातून गोलू व सचिन हे त्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरमध्ये वाळू चोरी करुन नेत होते. चिंचोली हायस्कूलजवळ तलाठी निलेश जानकीराम धांडे यांनी ट्रॅक्टर अडवले. ट्रॅक्टर ट्रॉलीसह जमा करण्यासाठी तलाठी धांडे यांनी कारवाई सुरु केली. तेव्हा ट्रॅक्टरचा आरोपी तेथे आले. त्यांनी तलाठी धांडे यांना ट्रॅक्टरवरुन ढकलून दिले. ट्रॅक्टर माझे असून काय करायचे ते करा, तुम्ही माझे काही करु शकत नाही, अशी आरोपी सचिन याने धमकी दिली. त्यानंतर चोरीची वाळू असलेले ट्रॅक्टर तेथून पळवून नेले. या प्रकरणी मंडळ अधिकारी मिलिंद देवरे यांनी यावल पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लिलावाची मुदत संपली
जिल्ह्यातील लिलाव करण्यात आलेल्या वाळू गटांच्या लिलावाची मुदत 9 जून रोजी संपुष्टात आली आहे. जिल्ह्यातील सर्व नदी पत्रातून वाळू उत्खनन व वाहतूक करण्यास बंदी आहे. असे असतानाही जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.