आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस ठाण्यात एका विरुध्द तक्रार दाखल:लाकूड नेण्यास राेखल्याने जीवे मारण्याची दिली धमकी

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजमालतीनगरातील मंदिराच्या आवारात जमा करून ठेवलेले लाकूड नेण्यास राेखले याचा राग येऊन वृध्दास जीवे मारण्याची धमकी दिल्या. या प्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात एका विरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे. दीपक पुनाजी माने (वय ६२, रा. राजमालतीनगर) यांनी या परिसरातील सार्वजनिक मंदिराच्या आवारात जमा करून ठेवलेले लाकूड जानू संजू पटेल हा घेऊन जात असताना त्याला जाब विचारून राेखले. त्याचा राग येऊन जानू पटेल याने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अदखल पात्र गुन्ह्याची नाेद करण्यात आली आहे. पुढील तपास पाेलिस उप निरीक्षक दत्तात्रय पाेटे हे करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...