आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जळगाव:सुरक्षा रक्षकाच्या कपाळाला पिस्तुल लावून जळगाव कारागृहातून तीन आरोपी पळाले

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पलायन केलेल्या कैद्यांमध्ये एका बडतर्फ पोलिसाचा समावेश

जिल्हा कारागृहाच्या सुरक्षा रक्षकाच्या कपाळाला पिस्तुल लावून व मारहाण करून तीन आरोपी पळाल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजता घडली. दरम्यान, पलायन केलेल्या कैद्यांमध्ये एका बडतर्फ पोलिसाचा समावेश आहे.

सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गोरव विजय पाटील रा.तांबापुरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड'अमळनेर) असे पळालेल्या आरोपींची नावे आहेत. सुशील मगरे हा पोलिस दलातून बडतर्फ झालेला आहे. पुणे येथील सराफ दुकानावर शस्त्रांचा धाक दाखवून त्याने दरोडा टाकला होता. एलसीबीच्या पथकाने त्याला डिसेंबर 2019 मध्ये बडोदा येथून अटक केली होती.

0