आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादौलतनगरातील शंखज अपार्टमेंटमधील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून साडेतीन लाखांचा ऐवज लांबवल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रवींद्र भागवत घुगे हे नूतन मराठा महाविद्यालयात ज्युनियर क्लार्क म्हणून आहेत. २ रोजी घुगे हे कुटुंबीयांसह त्यांच्या मूळगावी चिंचोली येथे कामानिमित्त गेले होते. फ्लॅट बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घुगे यांच्या घरातील कपाटातून मगंळसूत्रसह इतर सोन्याचे १ लाख ४० हजारांचे दागिने असा साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी दुपारी ही बाब शेजारी भागवत पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी घुगे यांना फोन करून चोरी झाल्याची माहिती दिली. घुगे हे जळगावात पोहाेचल्यावर रामानंद पोलिस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली. दरम्यान, या भागात रात्रीची गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.