आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानाचा पारा 43.3 अंशावर:जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची लाट; पुढील आठवड्यात वादळी पावसाचे सावट

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर महाराष्ट्रात मंगळवारपासून पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. इतकेच नव्हे तर याच काळात तुरळक ठिकाणी वादळासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. येत्या ९ ते १५ मे दरम्यान संपूर्ण राज्यावर वादळी पावसाचे सावट असेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.

मे महिन्यात तापमान सरासरीपेक्षा कमी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पहिल्याच आठवड्यात राज्यावर उष्णतेच्या लाटेसह पूर्वमोसमी पावसाचे ढग घोंगावत आहेत. मंगळवार ते गुरुवारपर्यंत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ४० किमी राहील असा अंदाज आहे. येत्या तीन दिवसांत जळगाव जिल्ह्यासह विदर्भातील अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यात तापमान ४३ ते ४४ अंशांवर जाईल. उत्तर भारत, मध्य भारत आणि पूर्वेकडील राज्यांमध्येही ३ मे रोजी पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावणार. राज्यात ९ मे ते १५ मे दरम्यान पूर्वमोसमी पावसाच्या ढगांची गर्दी असेल. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होईल. वाऱ्याचा वेग ताशी ४० कमीपेक्षा अधिक राहील.

बातम्या आणखी आहेत...