आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झळा तीव्र:उत्तर महाराष्ट्रात तीन दिवस अवकाळी पावसाचे संकेत, तापमान 42 अंशांवर; आकाश 31 टक्के ढगाच्छादित

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत हवामान विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या साप्ताहिक अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण-गोव्यात येत्या १४ एप्रिलपर्यंत अवकाळीचे सावट कायम राहणार आहे. या काळात उच्च तापमानासह ढगाळ वातावरण असेल. उकाड्यात वाढ होईल. मध्य महाराष्ट्रात अवकाळीचे पावसाची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात सोमवारी ४२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. सोमवारी सकाळच्या वेळी उत्तर-पश्चिम दिशेने ताशी १४ किलोमीटर वेगाने वारे वाहिले. तर आकाश ३१ टक्के ढगाच्छादित होते.