आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:मामा भाच्यासह तिघांचा धरणात बुडून मृत्यू, धानोरा महासिध्द येथील घटना

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली

तालुक्यातील धानोरा लघु प्रकल्पात (हत्ती पाऊल धरणात) मामा व दोन भाच्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (18 मे) रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे तीर्थक्षेत्र धानोरा महासिध्द गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 17 मे रोजी दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान पुणे येथे नोकरीस असणारा विनायक गाडगे (वय 27) वर्षे लॉकडाऊनमुळे धानोरा येथील घरी आला होता. तो, त्याच्या काकाचा मुलगा तेजस गाडगे (वय 18) आणि एका लग्नसमारंभासाठी दाताळा (ता. मलकापूर) वरून आपल्या बहिणीला घ्यायला धानोरा येथे आलेले त्यांचे मामा नामदेव वानखडे (वय 43) हे तिघे जण धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले. सध्या उन्हाळा असल्याने त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही.

रात्री उशिरापर्यंत तिघे जण घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. यानंतर सदर घटनेची माहिती गावच्या पोलिस पाटलांनी पोलिस स्टेशनला दिली. यानंतर पोलिसांनी धरण परिसरात शोध सुरू केला. यावेळी त्यांना धरणाकाठी कपडे व मोबाईल फोन आढळून आले. पण, तोपर्यंत रात्र झाल्याने अंधारात मृतकांचा शोध लागला नाही. आज सकाळी पुन्हा शोध घेतला असता पाण्यामध्ये मृरतदेह तरंगताना निदर्शनास आले.

बातम्या आणखी आहेत...