आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात तीन कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार प्रदान

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी ११ मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार दिला. यात भुसावळ विभागातील तिघांचा समावेश आहे. या तिघांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथे हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारात पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक व रोख रकमेचा पुरस्कारात समावेश आहे.

जुलै, ऑगस्ट महिन्यात कर्तव्यादरम्यान कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वेत सुरक्षितता निश्चित करण्यात या कर्मचाऱ्यांचे योगदानाबद्दल या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आले. यात भुसावळ विभागातील कृष्ण वनारे, नीलेश इंगळे, मोहंमद इद्रीस शेख इस्राईल यांचा समावेश आहे. तसेच हे पुरस्कार मुंबई तीन, नागपूर दाेन, पुणे दाेन, सोलापूरच्या एका कर्मचाऱ्याला संरक्षा पुरस्कारात प्रदान करण्यात आला. अतिरिक्त महाव्यवस्थापक आलोक सिंग, मुख्य संरक्षा अधिकारी पीयूष कक्कर, प्रधान मुख्य अभियंता राजेश अरोरा उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...