आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चोपडा:विरवाडे येथील तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू, चुलत भावासह दोन सख्या भावांचा समावेश

चोपडा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील तिघांचा आज दुपारी गूळ नदीचा प्रवाह असलेल्या निजरदेव या ठिकाणी पाण्यात पोहत असताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन सखे भाऊ व एक चुलत भावाचा समावेश आहे. कुणाल भरत पाटील, सुमित भरत पाटील हे दोघे भाऊ व त्याचा चुलत भाऊ असे तिघांचा आज दुपारी दीड वाजता मृत्यू झाला आहे.

कुणाल पाटील हा एमएससीचे शिक्षण घेत होता, तर सुमित हा नाशिक येथे इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला होता. तसेच, चुलत भाऊ ऋषिकेश पाटील हा बीएसी करून विरवाडे गावात फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता. तिघे जण शेतकरी कुटुंबातील होते आणि विशेष म्हणजे ऋषिकेश हा एकुलता एक होता तर कुणाल व सुमित देखील दोनच भाऊ होते. तिघेही अविवाहित असल्याने त्याच्या पश्चात फक्त आई वडील आहेत.