आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा:दोन रुग्णांच्या संपर्कातील तिघे पॉझिटिव्ह , वर्धेतील किराणा व्यावसायिकाचा समावेश

वर्धा9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • वर्धमनेरी येथील आईसह मुलगी कोरोना बाधीत

आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील ५२ वर्षीय रुग्णाची पत्नीसह मुलगी तर नागपूर येथील रेल्वे कर्मचारी ५९ वर्षीय कोरोना बाधीत असलेले वर्धेतील सहकारी यांच्यासह तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत.

वर्धमनेरी येथील रहिवासी असलेले ५२ वर्षीय व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांचे गृहविलगिकरण समाप्त होताच,त्यांना ताप व खोकला असल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या स्त्राव घेत तपासणी करिता पाठविण्यात आला असता,दिनांक ६ जून रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.घरातील सदस्यांचे स्त्राव तपासणी करिता पाठविले असता,५२ वर्षीय व्यक्तींची पत्नी व मुलगी या दोघींचा अहवाल पॉझिटिव्ह आला , तर मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहेत.नागपूर येथील रहिवासी असलेले ५९ वर्षीय रेल्वे कर्मचारी सिंदी रेल्वे स्थानकावर कार्यरत होते. ६ जून रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

वर्धेतील रामनगर भागात राहणारे ५९ वर्षीय रेल्वे कर्मचारी कोरोना बाधीत रुग्णांसोबत कर्तव्यावर होते.त्यांचा स्त्राव घेतला असता दिनांक ९ जून रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने जिल्ह्यात तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहेत. वर्धेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी किराणा दुकान असून,त्यांच्या दुकान साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची वर्दळ असल्याची माहिती मिळाली असल्याने,त्यांचा संपर्कातील ग्राहकांचा आरोग्य विभागाणे शोध घेणे सुरु केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...