आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांचे काँक्रिटीकरण:पाच काेटींतून तीन रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नागरी सुविधा व सेवा पुरवण्यासाठी नगरविकास विभागाने मंजूर केलेल्या पाच काेटींच्या निधीतील पाच पैकी दाेन कामे बदलण्यात आली आहेत. यात काॅलनी परिसराएेवजी प्रमुख रस्त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तर तीन रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार असल्याची माहिती आमदार सुरेश भाेळे यांनी दिली. पाच पैकी दाेन कामे बदलण्यात आली आहेत.

यात झाशीची राणी पुतळा ते काेल्हे शाळेपर्यंत काँक्रीट रस्ता तयार करण्यासाठी पूर्वी १ काेटी २० लाख रुपयांची तरतूद केली हाेती. त्यात आता वाढ करण्यात आली असून २ काेटी ५३ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. हरीश स्वीट मार्ट ते आयएमआरपर्यंत काँक्रिटीकरणा ऐवजी डांबरीकरणासाठी ५३ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. महामार्ग ते हनुमान मंदिर, अयाेध्या नगर ते तृप्ती काॅर्नरपर्यंत रस्ता डांबीकरणासाठी १ काेटी रुपये, छबिलदास खडके यांच्या जुने घरापासून ते जुना खेडी राेडपर्यंत काँक्रीट रस्ता तयार करण्यासाठी ५१ लाख रुपये तसेच नेरीनाका स्मशानभूमीमागील वखारपासून ते जुनी का.ऊ.काेल्हे शाळेपर्यंत काँक्रीट रस्ता तयार करण्यासाठी ४३ लाख रुपये खर्च केले जाणार असल्याचे आमदार भाेळेंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...