आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदी जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व दररोजच्या प्रार्थनेसाठी माजी विद्यार्थिनी असलेल्या तीन बहिणींनी पुढाकार घेत बहिणाई देवराम सपकाळे यांच्या स्मरणार्थ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले रंगमंच बांधून दिला. या रंगमंचाचे उद्घाटन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांच्या हस्ते झाले.माजी विद्यार्थिनी तथा सेवानिवृत्त शिक्षिका लीला सपकाळे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार कमल सपकाळे व सेवानिवृत्त उपकोषागार अधिकारी विमल सपकाळे या भगिनींनी या कामावर एक लाख रुपये खर्च केला. या रंगमंचाचे उद्घाटन कार्यक्रम अध्यक्षस्थानी उपसरपंच कैलास पाटील, तर डाएटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, अधिव्याख्याता डॉ.चंद्रकांत साळुंखे, शैलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्ताराधिकारी तुषार प्रधान, केंद्रप्रमुख कमलाकर चौधरी, सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त दिलीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक भगवान बडगुजर, समाधान जाधव, शिक्षिका मीनाक्षी पाटील, प्रीती फेगडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कांचन परदेशी व सदस्य उपस्थित होते.
बाला उपक्रमाला लोकसहभागाची मिळतेय जोड शिंदी येथील जि.प.शाळेने लोकसहभागातून ४५ पैकी ३५ मुद्दे पूर्ण केले. शाळेतील झाडांना ओटे बांधणे, भिंतीवर शैक्षणिक चित्रे, डिजिटल क्लासरुम, भौतिक गरजा भागवण्यासाठी वीज फिटिंग, कपाटे व अन्य सोयी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या. यामुळे बाला उपक्रमात ही शाळा तालुक्यात पहिल्यास्थानी आहे. त्यासाठी शिक्षक मेहनत घेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.