आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची आठ वर्षांची कार्यपूर्ती:जळगावात उदघाटन झालेल्या महामार्गावरून भाजयुमाेची विकास तीर्थ बाइक रॅली

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा पंतप्रधानपदाचा आठ वर्षांचा कार्यकाळ नुकताच पुर्ण झाला. तसेच भाजप सरकारच्या काळातील अनेक याेजनांपैकी जळगाव शहरातून जाणारा महामार्गाचे देखील नुकतेच उद्घाटन झाले. या निमित्ताने भारतीय जनता युवा माेर्चाच्यावतीने गुरुवारी महामार्गावरून विकास तीर्थ बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

शेकडो कार्यकर्ते उपस्थित

भाजपाचे नेते गिरीश महाजन तसेच भाजयुमाेचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुरेश भाेळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजयुमाे महानगराध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या नेतृत्वात माेटारसायकल रॅली काढण्यात आली. नुकतेच उद्घाटन झालेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कालिका माता चौक, अजिंठा चाैक, आकाश वाणी चौक मार्गे शिवतीर्थ मैदान येथे विकास तीर्थ बाइक रॅलीचा समाराेप झाला. यावेळी भाजयुमाेच्या रॅलीत १५० माेटारसायकलवर २०० पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

मान्यवरांची हजेरी

रॅलीवेळी भाजपा सरचिटणीस महेश जोशी, अरविंद देशमुख, भाजयुमाे जिल्हा सरचिटणीस महेश पाटील, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, अक्षय जेजुरकर, जिल्हा चिटणीस राहुल वाघ, महिला मोर्चा दीप्तीताई चिरमाडे, नगरसेवक अमित काळे, दीपमाला काळे, सुरेखा तायडे, शुचिता हाडा, गायत्री राणे, युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन बाविस्कर, विक्की सोनार आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...