आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारी समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी मन्यारखेडा येथे ११ हजार स्क्वेअर फूट जागेत भव्य सामाजिक, सांस्कृतिक भवन उभारले जाणार आहे. याचा समाजातील उच्च शिक्षण घेऊ शकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना उपयोग होणार असल्याची माहिती बारी पंच मंडळाचे अध्यक्ष विजय बारी यानी दिली.
श्री समस्त बारी पंच मंडळातर्फे बारी समाजातील गुणवंत विद्यार्थी सन्मान साेहळा रविवारी पांजरपोळ संस्थेत झाला. यावेळी आमदार सुरेश भोळे, माजी आमदार मनीष जैन यांच्या हस्ते ४०० समाजातील दहावी, बारावीसह विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रमेश बारी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात समाजाचे अद्य संत श्री रूपलाल महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. विजय बारी यांनी मन्यारखेडा येथे प्रस्तावित बारी समाज भवन निर्मितीसाठी ठेवलेल्या उद्देशपूर्तीची घोषणा केली. तसेच या भवनात समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजूंना अभ्यासासाठी रूम उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. या वेळी प्रा. बाळकृष्ण बारी, नगरसेविका शोभा बारी, डॉ. राजेंद्र पायधन, डॉ. मिलिंद बारी व समाजबांधव उपस्थित होते.
आमदार भोळे देणार एक लाख रुपयांची मदत
विद्यार्थ्यांचा विकास हा केंद्रबिंदू घेऊन समाजाने सुरू केलेला सांस्कृतिक भवनाचा उपक्रम हा कौतुकास्पद आहे. या भवनाच्या निर्मितीसाठी जिल्हा नियोजनाच्या निधीतून अधिकाअधिक निधी उपलब्ध करून देण्यासह एक लाखाचा निधी देण्याची घोषणाही केली. माजी आमदार मनीष जैन यांनी बारी समाजाने आज सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे, शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान आहे, हे योगदान कायम ठेवण्यासाठी गुणवंतांनी कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन केले. त्यांच्यातर्फे ४०० शालेय बॅगा वितरित करण्यात आल्या. तसेच आजी-माजी आमदारांनी उपस्थितांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ध्वजांचे वितरण करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.