आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑनलाइन व्यवसाय करण्याच्या नावाने महिलेस कर्ज काढण्यास भाग पाडून चौघांनी तिची ३ लाख २८१ रुपयात फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुरूवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली रमेश बाविस्कर (वय ४०, रा. खडकेचाळ, शिवाजीनगर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. १ मे २०२१ रोजी राहुल अग्रवाल, तुषार इंगळे, महेश शिंपी व पल्लवी महेश शिंपी या चौघांनी वैशाली यांची भेट घेतली. ऑनलाइन बिझनेसमध्ये जास्त फायद्याचे आमिष देऊन त्यांनी वैशाली यांना कर्ज काढण्यास भाग पाडले. नंतर कर्जाची रक्कम एका बँकेतून दुसऱ्या बँक खात्यात वर्ग करण्याच्या बहाण्याने ऑनलाइन मिटींग घेतली. या मिटींगमध्ये वैशाली यांच्या मोबाइलवर आलेले ओटीपी विचारुन घेत तीन वेळा करुन ३ लाख २८१ रुपये परस्पर वर्ग करुन फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वैशाली यांनी पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला. यामुळे पल्लवी शिंपी हिने त्यांना मारहाण केली. तर इतरांनी ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वैशाली यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र सोनार तपास करीत आहेत.
--------
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.