आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संप:परीक्षेसाठी विनाअनुदानित शिक्षकांची मदत घेणार‎ ; सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द

जळगाव‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित‎ मागण्यांसाठी मंगळवारी राज्यभरात संपाची‎ घाेषणा करण्यात अाली अाहे. महसूल व‎ जिल्हा परिषदेचे कर्मचारी पूर्ण ताकदीने संपात‎ सहभागी हाेणार अाहेत. इतर विभागांनीही‎ संपाला पाठींबा दिला असला तरी प्रत्यक्षात‎ संपात उतरणार नसल्याचे जाहीर केले अाहे.‎ त्यामुळे अाराेग्य, साफसफाई अादी नागरी‎ सेवा सुविधांवर परिणाम हाेण्याची शक्यता‎ नाही. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी‎ अादेश काढत संपात सहभागी हाेणाऱ्या‎ कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे‎ अादेश जारी केले अाहेत. रजाही रद्द करण्यात‎ अाल्या अाहेत.‎ सरकारी कर्मचाऱ्यांच्या मंगळवारच्या‎ संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट‎ झाले अाहे.

सिव्हिल सुरू राहणार‎ जीएमसी रुग्णालयातील नर्सेसही‎ काळ्या फिती लावून काम करणार‎ अाहेत. त्याच्या व्यतिरिक्त इतर‎ काेणत्याही कर्मचाऱ्यांनी संपात‎ सहभागी हाेणार असल्याचे पत्र‎ दिलेले नसल्याचे वैद्यकीय‎ अधिक्षक डाॅ. विजय गायकवाड‎ यांनी सांगितले. त्यामुळे मेडीकल‎ काॅलेज व सिव्हीलमध्ये उपचारांवर‎ काेणताही परिणाम हाेणार नाही.‎

बातम्या आणखी आहेत...