आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:प्राध्यापक भरतीची आज चाैकशी‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र‎ विद्यापीठातर्फे कंत्राटी सहायक प्राध्यापक‎ पदांच्या भरती संदर्भात जाहिरात २/२०२२‎ नुसार निवड प्रक्रिया राबवण्यात आली; परंतु‎ या भरतीच्या निवड प्रक्रियेत शासन निर्देश व‎ कायद्याचे उल्लंघन करण्यात आले‎ असल्याचा आरोप शिक्षणक्रांती संघटनेतर्फे‎ करण्यात आला होता. याबाबत चौकशीची‎ मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार‎ संचालक कार्यालय पुणे यांच्याकडून‎ तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.‎ बुधवारी सहसंचालक स्वतः या प्रकरणाची‎ चौकशी करणार आहेत.‎ कंत्राटी प्राध्यापक भरतीत स्थानिक निवड‎ समिती अपूर्ण होती. यासोबतच नेट सेट‎ पात्रताधारकांना अर्ज तपासणी प्रक्रियेत‎ मुलाखतीसाठी पात्र केले पण मुलाखतीत‎ त्यांना मात्र डावलण्यात आले. या निवड‎ प्रक्रियेची चौकशी लावून दोषींवर कारवाई‎ करावी, अशी मागणी शिक्षणक्रांती संघटनेतर्फे‎ संचालकांकडे केली होती. संघटनेच्या‎ मागणीनंतर संचालक कार्यलयाकडून‎ सहसंचालकांना तपासणी करून अहवाल‎ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.‎ दरम्यान, प्राध्यापक भरती संदर्भात प्रा. संजय‎ भोकरडोळे यांनी देखील तक्रार केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...