आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन सज्ज:आज गिरणा, बाेरी, अंजनी परिसरातील 8 तालुक्यातील 73 ग्रा.पं.ची निवडणूक

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान हाेणार आहे. जिल्ह्यातील एकूण १२२ ग्रामपंचायतींसाठी ४२१ मतदान केंद्रांवर रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर गिरणा, बाेरी, अंजनी परिसरातील चाळीसगाव येथे १४ ग्रामंचायतींसाठी, भडगावात ६, चाेपड्यात ५, अमळनेरात २०, पाराेळ्यात ५, एरंडाेलमधील ५, धरणगावातील ७, जामनेर येथील ११ अशा ८ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शनिवारी सर्व मतदान हाेणाऱ्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी रवाना झाले आहेत. तर मतदान प्रक्रिया शांततेत व सुरक्षीत पार पडावी म्हणून निवडणूक असलेल्या गावांमध्ये पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त राहणार आहे.

चाळीसगावातील १४ चुरस ...
चाळीसगाव तालुक्यातील ग१६ पैकी २ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध ठरल्याने १४ ग्रामपंचायतींसाठी १८ रोजी मतदान होणार आहे.

अमळनेर तालुक्यातील कर्मचारी सज्ज
अमळनेर |
तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होईल. त्यासाठी १७ डिसेंबरला सकाळी शहरातील इंदिरा भवन येथे कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. हे साहित्य घेवून कर्मचारी निवड झालेल्या रवाना झाले आहेत. तालुक्यातील २४ ग्राम-पंचायतींपैकी चार ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ राेजी मतदान होणार आहे. त्यासाठी एकूण ६३ बुथ आहेत. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, निवासी नायब तहसीलदार अमोल पाटील, नवनाथ लांडगे व सर्व महसूल कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

पाराेळा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
पारोळा |
तालुक्यात ५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान घेण्यात येणार आहे. तालुक्यातील सरपंच व सदस्य पदाच्या ४३ जागांसाठी या निवडणुकीत १३१ उमेदवार रिंगणात आहेत. या ५ ग्रामपंचायतींच्या ३८ सदस्य जागांसाठी ११२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर सरपंच पदाच्या ५ जागांसाठी १९ उमेदवार हे रिंगणात आहेत. निवडणूक हाेणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये कंकराज, धुळपिंप्री, सावखेडे तुर्क, कन्हेरे, मेहू या गावांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर कायदा व सुव्यवस्थेसाठी १५ पोलिसांचा बंदोबस्त असेल.

भडगावात ६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १६५ कर्मचारी
भडगाव |
तालुक्यातील कजगाव, कोळगाव, निंभोरा, पथराड, आडळसे, अंतुर्ली बुद्रुक अशा एकुण ६ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या मतदान हाेणार आहे. त्यासाठी १७ रोजी भडगाव तहसील कार्यालयात सकाळी इव्हीएम मशीन व किटचे वाटप करण्यात आले.मतदानाचे साहित्य घेवून अधिकारी, पोलिस कर्मचारी, लिपिक, शिपाई असे सर्व १६५ कर्मचारी बसेसने रवाना झाले आहेत, अशी माहिती तहसीलदार मुकेश हिवाळे यांच्या मार्गदर्शनात लिपिक चेतन राजपूत यांनी दिली. तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाच्या निवडणुकीत १७ जण रिंगणात आहेत.

तसेच ६ ग्रामपंचायतीच्या २०७ प्राप्त अर्जांपैकी ८२ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले होते. त्यामुळे आता ६ ग्रामपंचायतीसाठी ११७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात एकुण ८ बिनविरोध सदस्य निवडून आले आहेत. बिनविरोध झालेल्यांमध्ये कजगाव येथे १ सदस्य, कोळगाव ५ सदस्य, अंतुर्ली बुद्रुक २ सदस्यांचा समावेश आहे. सर्वच ठिकाणी शांततेत प्रचार झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...