आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रस्तावित ‘वीज कायदा दुरुस्ती विधेयक २०२२’ मंजुरीसाठी येत्या अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे. या धोरणाच्या विरोधात सोमवारी विविध वीज कामगार संघटना या दिवशी काम बंद आंदोलन करून निषेध नोंदवणार आहेत.
केंद्र सरकार वीज कायदा दुरुस्ती प्रस्ताव २०१४ पासून आणण्याचा प्रयत्न करत आहे. देशभरातल्या अनेक वीज क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना यांनी विरोध केल्याने अजूनपर्यंत संसदेत मंजूर करू शकले नव्हते. परंतु बहुमताचा वापर करीत तो मंजूर करून अधिवेशनात मंजूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कायद्याचा विरोध करण्यासाठी सोमवारी देशभरातील सर्व वीज कर्मचारी व अभियंते काम बंद आंदोलन करून निदर्शने करणार आहेत. वीज कर्मचारी अभियंता अधिकारी संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार नियाेजन आंदाेलनाचे नियाेजनही करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.