आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरांमध्ये आवळा पूजन हाेणार‎:उद्या आमलकी एकादशी;‎ यंदा तीन मुहूर्तांचा मेळ‎

जळगाव‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आवळ्याचं महत्त्व विशद करणारी एकादशी म्हणून‎ आमलकी एकादशीचं महत्त्व आहे. शुक्रवारच्या‎ एकादशीला यंदा पंचांगानुसार सर्वार्थ सिद्धी योग,‎ सौभाग्य योग आणि शोभन हे तीन योग तयार‎ होतील. तीन शुभ मुहूर्ताचा मेळ असल्याने‎ आमलकी एकादशीचा दिवस अत्यंत शुभ मानला‎ जात आहे. यानिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये‎ आवळा पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.‎ ब्रम्हदेवांनी सृष्टीसोबतच आवळ्याचं झाड‎ पृथ्वीवर निर्माण केल.

हे झाड अनेक आयुर्वेदिक‎ फायदे घेऊन येण्याबरोबरच भगवान श्रीविष्णूंनाही हे‎ झाड अत्यंत प्रिय आहे. ही एकादशी जो करेल‎ त्याला गोदानाचे पुण्य लाभेल, असे सांगितले जाते.‎ फाल्गुन शुक्ल पक्षातल्या एकादशीला आमलकी‎ एकादशी असेही म्हटले जाते, असे ज्येष्ठ पुरोहित‎ अनंत भालेराव यांनी सांगितले. होळीपूर्वी येणाऱ्या‎ एकादशीला पार्वती देवी शिवांसोबत काशीला‎ आली होती अशी आख्यायिका आहे. या दिवशी या‎ जोडप्यांचं रंगाची उधळण करत स्वागत करण्यात‎ आलं होतं. या दिवशी शिवगण महादेवांसोबत‎ गुलालाची होळी खेळले होते.‎

बातम्या आणखी आहेत...