आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वविविधतेला घातक:वनक्षेत्रात पर्यटन अन् बिबट्या मात्र वसाहतीकडे

जळगाव / गणेश सुरसे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन्य प्राण्यांचा अधिवास असलेल्या क्षेत्राला कुंपण घालून त्या क्षेत्रााचे सुशोभिकरण करणे जैवविविधतेला घातक ठरत असून त्यामुळेच बिबट्यांचा जळगाव शहरातील मानवी वस्तीकडे संचार होऊ लागला आहे, ही बाब समोर येऊ लागली आहे. हे कुंपण करताना किमान प्राण्यांच्या वावरासाठी तिथे मोठे पाइप टाकले जायला हवे होते, हा मुद्दाही आता उपस्थित केला जातो आहे.

शहरानजीकच्या माेहाडी राेड परिसरातील लांडाेरखाेरी, रायसाेनीनगरजवळ काही दिवसांपूर्वी नागरिकांना बिबट्या दिसला होता. मानवी वस्तीपासून ताे केवळ ३०० ते ४०० मीटर अंतरावर येऊन थांबला होता. तसा तो पूर्वीपासून इथे येत असल्याच्या नोंदी आहेत. या भागातील गवताळ क्षेत्र, झुडूपे, जंगल आणि निर्मनुष्य जागेवर बिबट्याचे अस्तित्व राहात आले आहे. परंतु, आता तिथे प्लॉट पाडून इमारती उभ्या राहिल्या आहेत. गवताळ क्षेत्र त्यामुळे कमी झाले आहे. जिथे प्राणी असत तिथेही आता कुंपण घातले गेल्यामुळे त्यांना शिकार मिळण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी या बिबट्यांचा शहराकडे वावर वाढतो आहे.

या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी असलेल्या वनविभागाने मात्र, ही बाब अत्यंत सहजपणे घेतली आहे. पूर्वी कुंभारखाेरी, लांडोरखोरी या जंगलसदृष्य भागात हरीण, रानडुक्कर, कोल्हा, रानमांजर हे वन्यप्राणी आढळून येत होते. या दोन्ही खोऱ्यांना सुशोभिकरण करून कुंपणाने बंदीस्त केले गेले.

बातम्या आणखी आहेत...