आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका बाजूला वाहतूक काेंडी झालेली असताना वाहतूक पाेलिस त्याकडे दुर्लक्ष करून वाहनचालकाकडे कागदपत्रे तपासून वसुली करतात. त्यांना विचारले असता आम्हाला वरुन टार्गेट देण्यात आले असल्याचे सांगतात, त्यांना काेणी टार्गेट दिले आहे का? असा सवाल माजी पालकमंत्री भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शुक्रवारी जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीत केला. या प्रश्नी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढील आठवड्यात बैठक घेण्याची सूचना देत विषयावर तात्पुरता टाळला.
शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियाेजन भवनात बैठक झाली. शहराच्या एन्ट्री पाॅईटवर नेहमीच माेठ्या प्रमाणावर वाहतूक काेंडी हाेते. ती साेडविण्यासाठी वाहतूक पाेलिसांची नेमणूक असताना ते काेंडी साेडविण्याएवजी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची कागदपत्रे तपासून दंड वसुली करतात. त्यांना असे काही टार्गेट दिले आहे. ते काेणी दिले आहे, असा सवाल आमदार सावकारे यांनी यावेळी उपस्थित केला. महामार्गावर वेग मर्यादेचे फलक नसताना वाहतूक पाेलिसांकडून वेग मर्यादा ताेडल्याबाबतही दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
टाेलच्या माध्यमातून लुट
यावेळी सावकारे यांनी चिखली ते तरसाेद दरम्यान महामार्गाचे चाैपदरीकरण झालेले नसताना मक्तेदाराकडून टाेल वसुली केली जात आहे. त्याबाबत फलक लावून महिन्याची पास काढण्याबाबत जाहिर सूचना लावण्यात आल्याचे सांगितले. ही वसुली ताबडताेब बंद करण्याची मागणीही यावेळी केली.
पुढील आठवड्यात बैठक
वाहतूक पाेलिसांच्या वसुली व महामार्गावरील टाेल वसुली या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी, पाेलिस अधीक्षक, न्हाईचे अधिकारी यांची संयुक्त बैठक लावण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.