आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:सिनेट निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी‎ अधिकारी अन‌् कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा,‎ विद्या परिषद व अभ्यास मंडळे या‎ प्राधिकरणाच्या निवडणुकीसाठी ८‎ जानेवारीला २५ मतदान केंद्रांवर‎ मतदान होणार आहे. या‎ निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी‎ सोमवारी अधिकारी व‎ कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग‎ घेण्यात आला.‎ सिनेट निवडणुकीसाठी जळगाव‎ जिल्ह्यात १३, धुळे जिल्ह्यात ८,‎ नंदुरबार जिल्ह्यात ४ अशा एकूण २५‎ मतदान केंद्रावर मतदान होणार‎ आहे.

विद्यापरिषदेसाठी १८७१ मतदार‎ आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार‎ पाडण्यासाठी सोमवारी विभागीय‎ अधिकारी, केंद्र अध्यक्ष, मतदान‎ अधिकारी व मतदान सेवक यांच्या‎ नेमणुका करण्यात आल्या असून,‎ ७ विभागीय केंद्र अध्यक्ष असतील,‎ १८२ विद्यापीठ आणि‎ महाविद्यालयाचे कर्मचारी या‎ विविध केंद्रांवर कार्यरत असतील.‎

काही राखीव देखील असणार‎ आहेत. निवडणूक निर्णय‎ अधिकारी तथा कुलसचिव डॉ.‎ विनोद पाटील यांनी निवडणूक‎ प्रक्रिया कशी राहील याबद्दल‎ माहिती दिली. ८ जानेवारीला‎ सकाळी ८ ते सायंकाळी ५ या‎ कालावधीत मतदान होणार आहे.‎ १० जानेवारी रोजी विद्यापीठात‎ मतमोजणी होईल. या वेळी‎ निवडणूक विभाग प्रमुख इंजि. आर.‎ आय. पाटील, डॉ. मुनाफ शेख‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...