आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलंब:थंडीमुळे उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्यांना विलंब

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पंधरवड्यापासून तापमानात चढ-उतार सुरू आहे. तीन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढते आहे. त्यातच उत्तर भारत व दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आहे. त्याचा परिणाम रेल्वेगाड्यांवर होताे आहे. उत्तर प्रदेश व दिल्लीकडून येणाऱ्या अनेक गाड्या विलंबाने धावताना दिसत आहेत.

सकाळी पडणाऱ्या दाट धुक्यामुळे सिग्नल यंत्रणा व्यवस्थित दिसत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनातर्फे अनेक एक्सप्रेस गाड्यांना सुरुवातीच्या स्थानकातूनच उशिराने सोडण्यात येत आहे. तसेच या धुक्यामुळे अनेक रेल्वे गाड्या ह्या ताशी ४० ते ५० वेगाने धावत असल्याने या गाड्या नियमित वेळापत्रकापेक्षा चार ते पाच तास विलंबाने धावत आहेत.

यात आग्रा केंट लोकमान्य टिळक सुपरफास्ट गाडी साडेपाच तास उशिराने धावली. तर ताप्तीगंगा एक्सप्रेस सहा तास, गोरखपूर लोकमान्य टिळक सुपरफास्ट एक्सप्रेस सहा तास, हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस तीन तास तसेच गोरखपूर-पुणे, बरेली लोकमान्य टिळक व कर्नाटक सुपरफास्ट ह्या गाड्या रविवारी अडीच तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशाची मोठी गैरसोय झाली. गेल्या काही दिवसांपासून थंडी व धुक्यामुळे गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकात ताटकळत थांबावे लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...