आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात प्रस्थापितांना नाकारत नवख्यांना संधी मिळाली असून शिवसेनेची सत्ता मात्र कायम राहिली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कोथळी गावात मात्र शिवसेनेने दणका दिला आहे. ११ जागांपैकी शिवसेना पुरस्कृत पॅनलला पाच तर एक जागा अपक्ष अन् पाच जागांवर इतर विजयी झाले आहेत. सहा जागांवर खडसेंच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे व खडसेंच्या कन्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे या दोघांनी दावा केला आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात ४ जिल्हा परिषद सदस्यांच्या गटात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजपच्या तीन जि.प. सदस्यांना अपयश आले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांचे मूळ गाव असलेल्या वाघळीत राष्ट्रवादी पुरस्कृत लोकमान्य पॅनलमध्ये १५ जागांसाठी लढत झाली. यात राष्ट्रवादीच्या पॅनलने १० जागांवर दणदणीत मिळवून सत्तापरिवर्तन केले. भाजपच्या पॅनलला केवळ ४ जागा राखत्या आल्या.
धुळ्यात प्रतिष्ठितांचे गड कायम :
धुळे - जिल्ह्यात प्रतिष्ठितांनी आपापले गड कायम राखत तालुक्यात आपल्याच गटाचे वर्चस्व असल्याचा दावा सर्वांनीच केला आहे. धुळे तालुक्यात आमदार कुणाल पाटील, शिंदखेड्यात आमदार जयकुमार रावल तर शिरपूरमध्ये अमरीश पटेल यांनी वर्चस्व कायम राखले.
तृतीयपंथी अंजली जानचा विजय
जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील तृतीयपंथी अंजली गुरुजान जान हिने विजय मिळवला. गेल्या वेळी ११ मतांनी तिचा पराभव झाला होता. अंजली यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला होता. या निर्णयास औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले हाेते. हा निकाल अंजली यांच्या बाजूने लागला होता व त्यानंतर निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. विजयानंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.