आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर घर तिरंगा:शहरातील 33448 घरांवर तिरंगा, संख्या आणखी वाढणार, सदाेष झेंड्यांचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवा निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात जळगाव शहरातील ३३ हजार ४८६ घरांवर शनिवारी तिरंगा फडकवण्यात आला. आतापर्यंत झालेल्या विक्रीच्या अंदाजानुसार दाेन दिवसांत शहरात ५० हजारांपेक्षा जास्त घरांवर झेंडा लावला जाणार आहे. दरम्यान, सदाेष ध्वजासंदर्भात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना अहवाल पाठवण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण हाेत आहेत. या निमित्ताने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव साजरा केला जाताे आहे. १३ ते १५ आॅगस्ट या तीन दिवसांत घराघरात झेंडे लावण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहे. शहरातील ९२ हजार ३०४ मालमत्तांपैकी सुमारे ५० ते ६० हजार घरांवर झेंडे लावले जाणार आहेत. शहरातील अपार्टमेंटची संख्या लक्षात घेता सर्व रहिवासी मिळून एक झेंडा लावण्याचेही नियाेजन केले जात आहे. मनपातर्फे ८०० पेक्षा जास्त महिलांचा रक्तदाब, शुगर व ईसीजी तपासणी झाली. मनपा व अार.एल. हाॅस्पिटलतर्फे हा उपक्रम राबवला असे अतिरिक्त आयुक्त श्याम गाेसावी यांनी सांगितले.

बचत गटांकडे केवळ दीड हजार झेंडे शिल्लक पंधरा दिवसांपासून झेंडे निर्मितीत गुंतलेल्या बचत गटांनी शनिवारपर्यंत ४० हजार झेंड्यांची विक्री केली. सायंकाळपर्यंत बचत गटांकडे केवळ दीड हजार झेंडे शिल्लक हाेते. बचत गटांकडून झेंडे निर्मिती थांबवण्यात येणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. प्रभाग कार्यालयातील लिपिकांनी दिलेल्या अहवालानुसार शहरात ३३ हजार ४८६ झेंडे लावण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...