आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान‎:चाळिशीनंतरच्या स्त्रियांसाठी‎ मिळाली आरोग्याची त्रिसूत्री‎

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ ब्रह्मश्री महिला मंडळातर्फे संत‎ ज्ञानेश्वर मंदिरात ‘महिलांचे‎ चाळिशीनंतरचे शारीरिक व‎ मानसिक आरोग्य’ यावर व्याख्यान‎ झाले. यात डॉ. रेवती गर्गे यांनी‎ महिलांना मार्गदर्शन केले. प्रत्येक‎ स्त्रीने कुटुंबा बरोबर स्वतःची‎ काळजी घेतली पाहिजे. व्यायाम,‎ योगा आणि आहारावर लक्ष देणे‎ आवश्यक आहे, असा सल्ला‎ त्यांनी महिलांना दिला.‎ कार्यक्रमात छाया वाघ, भाग्यश्री‎ राव, हेमलता कुलकर्णी यांच्या हस्ते‎ सरस्वती पूजन करण्यात आले.

या‎ वेळी पिंक रिक्षा महिलाचालक‎ संगीता बारी, पौर्णिमा कोळी, माधुरी‎ भालेराव, जयश्री कुवर, मीना‎ कोळी, रंजना सपकाळे, माधुरी‎ निळे, रंजना पवार या महिलांचा‎ सन्मान करण्यात आला.‎ रिक्षाचालक महिलांनी विविध‎ अनुभव कथन केले. विशाखा‎ देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.‎ परिचय मृदुला कुलकर्णी यांनी करुन‎ दिला. मंजूषा तेंडूलकर यांनी आभार‎ मानले. सुचिता कुलकर्णी, मेधा‎ कुलकर्णी, पल्लवी भंडारी, सविता‎ काळे यांनी नियोजन केले.‎

बातम्या आणखी आहेत...