आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षयरोग आजाराबाबत जनजागृती:याेग्य औषधाेपचाराने क्षयराेग हाेताे बरा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशाेत्सवानिमित्त आरोग्य विभागाकडून क्षयरोग आजाराबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. क्षयराेग हा असाध्य राेग नाही, तर याेग्य औषधाेपचार घेतल्यास त्यावर मात करता येते, अशी माहिती नागरिकांना देण्यात येत आहे.

मनवेल (ता. यावल) येथील आशा स्वयंसेविकांमार्फत गणेश मित्र मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांच्या वेळी उपस्थित असलेल्या महिलांना आशा सेविका रंजना कोळी, पूनम पाटील यांनी क्षयरोग आजाराबाबत जनजागृतीसाठी मार्गदर्शन केले.

क्षयरोगमुक्त अभियानांतर्गत यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. गफूर तडवी, डाॅ.स्वाती कवडीवाले, क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे, समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ.अस्मा प्रवीण, नमुउद्दीन शेख, गट प्रवर्तक चित्रा जावळे, लीना पाटील यांच्या देखरेखीत क्षयरोग आजाराची लक्षणे, त्यावरील उपचार याबाबत माहिती देण्यात आली. क्षयरोग आजार उपचार घेेतल्यास बरा होतो. या आजारावर आरोग्य विभागामार्फत औषधाेपचार करण्यात येत असून शासनाकडून अनुदान दिले जाते, असे सांगितले. रुग्णांनी काेणत्याही अफवांना बळी न पडता आरोग्य विभागाशी संपर्क साधावा व क्षयरोग आजाराबद्दल शंका समाधान करून घ्यावे.

बातम्या आणखी आहेत...