आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेग्य सेवा:क्षयरोग केंद्रात रुग्णसंख्या नसताना कर्मचारी वाढवले

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय रुग्णालयात असलेल्या राष्ट्रीय क्षयरोग केंद्र विभागात सध्या रुग्ण कमी आणि कर्मचारी जास्त अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र समाेर येऊ पाहते आहे. गेल्या चार महिन्यांत क्षयरोगाचे केवळ ५० रुग्ण तपासणीसाठी आले आहेत. तर महिन्याला सरासरी केवळ १२ ते १५ रुग्ण असल्यामुळे या ठिकाणी केवळ एक परिचारिका एवढा स्टाफ गरजेचा असताना तेथे दोन परिचारिका कार्यरत आहेत. त्यातही कार्यमुक्त केलेल्या आणखी एक परिचारिकेला केंद्रात आवश्यकता नसतानाही २७ ऑक्टोबर रोजी पुन्हा क्षयरोग केंद्रात पदस्थापना दिली.

एकूण ३ परिचारिका याठिकाणी देण्यात आल्या आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांचे हे आदेश पुन्हा चर्चेत आहेत. यापूर्वी मोहाडी येथील महिला रुग्णालयातदेखील एकही रुग्ण नसताना तेथे २२ परिचारिका कार्यरत आहेत. तसेच ४ ते ५ डॉक्टर्स कार्यरत आहे.

शासकीय रुग्णालयात मात्र मनुष्यबळाचा तुटवडा असून परिचारिकांची आवश्यकता भासत आहे. अशावेळी गरज नसताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिचारिकांचे मनुष्यबळ काढून घेतल्याने अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, क्षयराेग केंद्रात सध्या रुग्णसंख्या अतिशय ताेकडी असल्याने या ठिकाणी गरज नसताना जाे स्टाफ वाढवण्यात अाला अाहे ताे कमी करून शासकीय रुग्णालयात दिला पाहिजे. जणेकरून सध्या राेजच्या बाह्यरुग्ण तपासणी कक्षात जी रुग्ण संख्या वाढते अाहे त्यांच्यावर उपचारासाठी खऱ्या अर्थाने या स्टाफचा अधिक उपयाेग हाेऊ शकताे.

बातम्या आणखी आहेत...