आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचा उद्या निकाल:राज्यातील 14 लाख  85 हजार 826 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा; गुणपत्रिका मिळायला आठवडा लागणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सर्व पालक आणि विद्यार्यथ्यांना उत्सुकता लागलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दु्पारी एक वाजता लागणार आहे. तशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यंदा कोरोनाची साथ ओसरल्यामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.

कसा पाहता येईल निकाल?

राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार बारावीचा निकाल बुधवारी लागणार आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचे नाव देऊन आपला निकाल बघता येईल.

जळगाव​मध्ये 282 केंद्रावर परीक्षा

जळगाव जिल्ह्यात 282 केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. 48 हजार 544 विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. प्रत्यक्ष गुणपत्रक मिळण्यास आठवडाभराचा कालावधी लागत असल्याने निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकालाच्या प्रती काढून ठेवाव्या. जेणेकरून प्रवेश प्रक्रियेला अडचण येणार नाही. बारावीच्या बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल बघायला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...