आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Twelfth To Twelfth Will Have 30 Per Cent Skill Based Questions; There Is No Change In Internal Assessment From Ninth To Twelfth |marathi News

सीबीएसईचा निर्णय:अकरावीसह बारावीला काैशल्य आधारित प्रश्न 30 टक्के राहणार; नववी ते बारावीपर्यंत अंतर्गत मूल्यांकनात बदल नाही

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीबीएसई नववी, दहावी व अकरावी आणि बारावीसाठी अंतर्गत मूल्यांकनात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्याप्रकारे शाळांमध्ये अंतर्गत परीक्षा होत होती, त्याचप्रकारे ती होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाशी निगडित शाळांच्या नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना आता घोकंपट्टीऐवजी चिकित्सकपणे उत्तरे द्यावी लागतील. या वर्गांसाठी बोर्डाने काैशल्य आधारित प्रश्नांची संख्या वाढवली आहे. आता असे ४० टक्के प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यात घटनांवर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल. अकरावी, बारावीला काैशल्य आधारित प्रश्न ३० टक्के असतील.

एकाच सत्रात परीक्षा, शिक्षक-विद्यार्थ्यांना दिलासा
पहिल्या सत्रात २० टक्के व दुसऱ्या सत्रात २० टक्के काैशल्य आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून बोर्डाची परीक्षा जुन्या व्यवस्थेनुसार एकाच वेळेस होईल, असे बोर्डाने जाहीर केले होते. कोरोना महामारीच्या कारणामुळे शैक्षणिक सत्र दोन सत्रात विभागण्यात आले होते. त्यात ५०-५० टक्के अभ्यासक्रमानुसार परीक्षा झाल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...