आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा जणांचा दरोड्याचा प्रयत्न:दोघांना अटक, चार जण फरार; आरोपींकडून एका घरात शिरुन आई, मुलाला मारहाण

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरार आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली. - Divya Marathi
फरार आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली.

जिल्हापेठेतील ऑकीर्ड हॉस्पिटलजवळील घरात महिलेचा गळा दाबून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कॉल रेकॉर्डच्या सहाय्याने अटक केली. आरोपींविरुध्द यापूर्वीही खून,फसवणुकीसह दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचे चार साथीदार फरार झालेले असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली.

आई, मुलाला मारहाण

सागर पाटील (वय २५ रा. कुसुंबा), प्रशांत पाटील (वय २७ रा. मातोश्री), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. १२ जून रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ऑर्कीड हॉस्पिटलजवळील एका घरात सहा जणांनी आई व मुलाला मारहाण केली. महिलेचा गळा दाबून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची संपूर्ण पाहणी केली. मिळालेली गोपनिय माहिती व तांत्रिक विश्लेषणावरुन संशयितांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सागर याला ताब्यात घेवून विचारपूस केली. तेव्हा त्याने इतर आरोपींची नावे सांगत गुन्ह्याची कबुली दिली.

संशयित बेरोजगार

गुन्ह्यातील संशयित आरोपी सागर हा बेरोजगार असून त्याच्यावर यापूर्वी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दरोडा, फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कमलेश सोनार याच्याविरुध्द पाचोरा पोलिस ठाण्यात खून व दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. प्रमोद चौधरी याच्याविरुध्द पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सागर व व प्रशांत यांना पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...